ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Shankar Marathe, Mumbai - 9th August, 2022 - मुंबईत आज सकाळी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरगावातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे
प्रदीप पटवर्धन यांची 'मोरुची मावशी' या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. त्याचबरोबर अनेक नाटकात, चित्रपटात व मालिकांमध्ये काम केले होते. त्याशिवाय नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, पोलिस लाईन, वन टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, थँक यू विठ्ठला, एक शोध, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले - ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.
Comments