शंकर मराठे - मुंबई, १० मार्च २०२१: – ‘षष्ठी फिल्म्स अँड एंटरटेन्मेट’च्या बॅनरखाली येत असलेल्या आगामी ‘तुझं माझं अरेंज मैरिज’ या चित्रपटाचा ट्रेलर ७ मार्च २०२१ रोजी मुंबईतील जुहूमधील पिव्हीआर येथे नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी निर्माते, दिग्दर्शक आणि इतरांबरोबर प्रसार माध्यमांचा संवादही आयोजित करण्यात आला होता. यावेळी सयाजी शिंदे, अभिजित चव्हाण, सुनील गोडबोले, अभिलाषा पाटील, बिपीन सुर्वे, प्रीतम कागणे, अमोल कागणे आणि मीरा सारंग तसेच निर्माते अमित ललित तिळवणकर आणि ज्योती अमित तिळवणकर; सहनिर्माते तुषार रणभोर, सचिन शाह आणि हितेश बाकलीवाल, दिग्दर्शक दिनेश विजय शिरोदे , कोरियोग्राफ़र प्रदीप कलेकर हे मान्यवर उपस्थित होते. चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजित चव्हाण, सुनील गोडबोले, अभिलाषा पाटील, बिपीन सुर्वे, प्रीतम कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे एक कौटुंबिक नाट्य असून या चित्रपटाची निर्मिती अमित ललित तिळवणकर आणि ज्योती अमित तिळवणकर यांनी केली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तुषार रणभोर, सचिन शाह आणि हितेश बाकलीवाल. चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजय शिर...