अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईतील अव्वल हेअर स्टाइलिस्ट शिवराम भंडारी यांचे प्रेरणादायक पुस्तक प्रकाशित



भारताचे दिग्गज आणि प्रख्यात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी शिवाज सैलून चे प्रसिद्ध हेयर स्टाइलिस्ट शिवराम के. भंडारी यांचे पुस्तक प्रकाशित केले, ज्यांच्या प्रेरणादायी जीवनाची कथा नव्या पिढीपर्यंत आणि होतकरू उद्योजकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दीष्ट आहे आणि या पुस्तकातून स्पष्ट दिसत आहे कि मेहनत आणि शिकण्याची इच्छाशक्ति हे यशा प्राप्त करण्याचे दोन आधारस्तंभ आहेत.

जयश्री शेट्टी द्वारा लिखित पुस्तकाचे नाव आहे स्टाइलिंग ऑन द टॉप, द जर्नी ऑफ शिवा बॉलीवुड सेलिब्रेटेड हेयरस्टाइलिस्ट. हे पुस्तक मंजुल पब्लिशिंग हाउस ची एक छाप अमेरीलिस द्वारा प्रकाशित आणि हार्पर कॉलिन्स इंडिया द्वारा वितरण केले आहे.

आपल्या चित्रपटांच्या शूटिंग आणि बैक-टू-बैक मीटिंग्सचे व्यस्त वेळापत्रक असूनही, अमिताभ बच्चन यांनी नुकतीच मुंबई येथील त्यांचे कार्यालय जनक मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पुस्तकाचे अनावरण करण्यासाठी वेळ काढला आणि पुस्तकांच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.


अमिताभ बच्चन यांचे जादुई व्यक्तिमत्व त्या सायंकाळी तेथे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीसोबत त्यांनी मित्र, कुटुंब आणि जवळच्या मित्रांसाठी संध्याकाळचा सोहळा संस्मरणीय बनविला. मुख्य म्हणजे त्यांचे हसू आणि पुस्तक आणि तेथे उपस्थित प्रत्येकासह त्यांचे छायाचित्र काढल्यामुळे त्यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण होती. शिवराम किंवा शिवची मुले रोहिल आणि आराध्या बरोबर काही प्रेमळ क्षण घालवताना देखील ते दिसले.
पुस्तक "स्टाइलिंग ऑन द टॉप" शिव च्या जीवनातील अद्भुत जीवन यात्रा, त्यांच्या सुरुवाती वर्षांत कठोर परिश्रमांचे वर्णन केले आहे, तसेच ह्यामध्ये कर्नाटकातील डोंगराळ गावात न्हाव्याच्या दुकानात काकांना मदत करत असताना ते आजपर्यंतची जीवनागाथा आहे, आता त्यांचे शिवाज हा एक ब्रांड झाला आहे. ब्रांड नेम भारताच्या महानगरात प्रसिद्ध आहे. त्यांचा संघर्ष आणि त्यानंतरच्या यशाची गाथा संयम आणि दृढनिश्चयाचा मंत्र देते. हे कठोर परिश्रम आणि सकारात्मकतेचा पुरावा आहे की जिथे आपण प्रारंभ करतो, तिथे आपण पोहोचू शकतो कि नाही हे कोणीही ठरवू शकत नाही, जे आपल्याला पोहचविते.

संयुक्त अरब अमिरातीच्या कतारमध्ये, त्यांनी जगातील विविध भागातून येणा-या खेळाडूंच्या हेयर स्टाइल एक्सपोज केली, नंतर त्यांनी दोन नामांकित संस्थां विदाल ससून आणि टोनी एंड गाई कडून हेयरस्टाइल मध्ये हाई-फैशनचा अभ्यास केला. या सर्व गोष्टींमुळेच त्यांनी स्वत:ला जागतिक दर्जाचे हेअरस्टाइलिस्ट म्हणून प्रस्थापित केले.

आपणास माहित आहे काय की ते आपल्या क्षेत्रात मोठे होण्याची स्वप्ने घेऊन मुंबईत आले आणि ८० दशकाच्या मध्यावर मुंबईच्या उपनगरी ठाण्यात एका लहान नाईच्या दुकानातून सुरुवात केली. आज त्याच्याकडे शिवाज नावाच्या ब्रांड नावाने २० सलून आणि स्पा, बीस्पोक सैलून आणि अनेक कॉस्मेटिक उत्पादनांची मालकी आहे. शहरात पसरलेल्या शिव च्या आउटलेट्स मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी आणि कॉरपोरेट विश्वातील मान्यवरांची गर्दी असते. स्टाइलिंग ऑन द टॉप पुस्तक मराठी व कन्नड भाषेची आवृत्ती लवकरच उपलब्ध होईल. या नंतर गुजराती आणि हिंदी भाषेत देखील अनुवाद करण्यात येणार आहे.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर