टिक टॉक स्टार एकता जैन गरबा उत्सवात धम्माल करणार
एकता जैन अशी एक बहुमुखी प्रतिभावान नायिका आहे, जीची खास ओळख गुजराती नाटकांतून होते आणि ती नवरात्रि उत्सवात देखील सहभागी होऊन लोकांचे लक्ष वेधून घेते. नाटकांसोबत ह्या नायिकेचे बहुभाषी काम रंगमंचावर देखील तेवढेच लोकप्रिय आहे. अभिनेत्री एकता जैन ने हिंदी, इंग्रजी, गुजराती व त्याच बरोबर संस्कृत भाषेतील नाटकांतून देखील कामे केली आहेत. ‘शाका लाका बूम बूम’ व ‘शगुन’ तीचे सर्वात लोकप्रिय प्रोजेक्ट्स आहेत, ज्यात तीने काम आहे. वेगवेगळ्या भाषेतील भूमिका साकारून आपली अभिनय प्रतिभा एकता जैन दाखवुन दिली आहे व तिने 4,71,000 टिक टॉक फॉलोवर्सला आकर्षित केले आहे.
तसे पाहिले तर ह्या अभिनेत्रीला गरबा उत्सवा वर उत्कट प्रेम आहे आणि ती हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करते. आपला आवडता सण साजरा करण्यासाठी नुकतेच अभिनेत्री ने मुंबई तील श्री सुत्रम स्टुडिओ मध्ये नवरात्रीच्या थीमवर खास करुन फोटोशूट केले. या फोटोशूट मध्ये अभिनेत्री ने उत्कृष्ट ड्रेस व सदाबहार लुक सोबत लहान मुलांसारखी मजाक-मस्ती करत-करत प्रादेशिक वेशभूषेत शूट केले. त्याच बरोबर, अभिनेत्री शहरांतील वेगवेगळ्या मंडळातील गरबा उत्सवात धम्माल करण्यासाठी देखील सज्ज आहे.
एवढचं काय तर, ही चंचल व टिक टॉक स्टार एकता जैन लवकरच डायरेक्टर मनोज शर्मा यांचा येणारा हॉरर-कॉमेडी सिनेमा ‘खली बली’ मध्ये झळकत आहेत, जो वन एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शंस व प्राची मूवीज चे कमल किशोर मिश्रा द्वारा निर्मित आहे. ह्या सिनेमात एकता जैन ने इंट्रेस्टिंग व महत्वपूर्ण साकार केला आहे. नुकतेच ह्या सिनेमातील एक रोमांटिक गाणं कुमार शानू यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आहे आहे. ६५ टक्के शूटिंग पूर्ण झालेल्या ह्या सिनेमांतील कलाकार आहेत - धर्मेंद्र, मधु, रजनीश दुग्गल, कायनात अरोरा, रोहन मेहरा, विजय राज, राजपाल यादव, हेमंत पांडे, यासमीन ख़ान, असरानी व एकता जैन. हा सिनेमा पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
Comments