मिस ट्रांसक्वीन इंडिया 2018 चे दुसरे संस्करण, ट्रांसजेंडर्स साठी एक ब्यूटी पीजेंट, मुंबई मध्ये ७ ऑक्टोबर रोजी द ललित हॉटेल मध्ये आयोजित केले जाईल.
सुमारे शंभर स्पर्धकांनी ह्या स्पर्धेसाठी टॉप 20 मध्ये येण्यासाठी संघर्ष केला. फाइनल इवेंट मध्ये दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कोलकाता, कर्नाटक आणि अन्य राज्यातील फाइनल मिस ट्रांसक्वीन इंडिया 2018 टायटल जिंकण्यासाठी स्पर्धा करतील
ब्यूटी पीजेंट - मिस ट्रांसक्वीन इंडिया श्रीमती रीना राय यांचे विचार आहे. तिच्या मते, एलजीबीटी समुदायाची स्वीकृती आणि समावेश फक्त तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा आम्ही त्यांना योग्य आदर व सन्मानाने वागू लागतो. "आम्ही ललित नवी दिल्ली, द ललित मुंबई आणि ललित अशोक बंगलोर येथे ऑडिशन घेतली. मिस ट्रांसक्वीन इंडियाच्या संस्थापक व अध्यक्ष मिस रीना राय यांनी सांगितले कि काही वर्षांपासून या समुदायासोबत घनिष्ठपणे काम करून आता मी त्यांना सशक्त करू इच्छितो, दृश्यमानता वाढवू आणि रोजगाराच्या संधी निर्माण करू आणि ह्या माध्यमातून समाकलित समाजाची उभारणी करण्यास योगदान देऊ.
स्पर्धक विविध क्रियाकलापा मध्ये - खेळ, सांस्कृतिक आणि विविध प्रश्नांची उत्तरे देतील. पीजेंट चे विजेते थायलंडमधील मिस इंटरनेशनल क्वीन पीजेंट मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. गार्नेट अँड गोल्ड मिस ट्रांसक्वी इंडिया 2018 चे अधिकृत मीडिया पार्टनर आहेत. ओल्मेक हे ब्यूटी व ट्रीटमेंट पार्टनर आहे, क्रोनोकेयर हे गिफ्टींग पार्टनर आहेत, सांताचेफ एनजीओ पार्टनर आणि पीजेंट वोट मिस ट्रांसक्वीन इंडिया 2018 साठी ऑनलाइन मतदान पार्टनर असेल.
द ललित हे हॉस्पिटेलिटी पार्टनर आहे. द ललित सूरी हॉस्पिटेलिटी ग्रुपचे कार्यकारी संचालक श्री केशव सूरी मिस ट्रांसक्वीन इंडिया पीजेंटशी असोसिएशनबद्दल उत्सुक आहेत. ते म्हणतात, "अशा उपक्रमांसह आम्ही समुदायासाठी अधिक समावेशी प्लॅटफॉर्म तयार करण्यास सक्षम होऊ. त्यांना कॉरपोरेट्स, बॉलीवूड आणि समाजात योग्य स्वीकृतीमध्ये प्रतिनिधित्व मिळावे. मी त्यांना समावेशनच्या प्रवासात सर्वतोपरी शुभेच्छा देतो. अधिक लोकांना ह्यांच्याबद्दल जाणून देणे आणि ट्रांसजेंडर कम्युनिटीला मुख्यप्रवाह आणणे व त्यांचा स्वीकार करणे हे आहे.
Comments