‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील पहिले गाण रिलीज




राजकला मूवीज एंड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि. च्या बैनर खाली निर्मित मराठी चित्रपट माझ्या बायकोचा प्रियकर मधील २०१८ चे पहिले धम्माल गाण तू हात नको लाऊ मुंबई मध्ये धूमधडाक्यात रिलीज करण्यात आले आहे. हे गाणं स्वरबद्ध केले आहे स्वाती शर्मा व नकाश अजीज ने, म्यूजिक राजु सरदार चे आहे. नुकतेच झी म्यूजिक ने हे गाण रिलीज केले व ह्या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हे गाणं डान्सर मीरा जोशी व मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रियदर्शन जाधव वर चित्रित करण्यात आले आहे. चित्रपटांचे निर्माता दिपक रुईया, प्रदिप के शर्मा, राजेंद्र गोयंका, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा व अक्षय जयंतीलाल गाडा आहेत, त्याचबरोबर सह-निर्माता रेश्मा कडाकिया, कौशल कांतिलाल गाडा, निरज गाडा आहे. स्टोरी व डायरेक्शन – राजीव एस रुईया यांचे आहे. हा चित्रपट २३ नोव्हेंबर, २०१८ रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे. प्रस्तुतकर्ता व ड्रिस्टीब्यूटर पेन इंडिया लिमिटेड आहे. चित्रपटांतील मुख्य कलाकार प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, भाग्यश्री मोटे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, पदम सिंग, सुरेश पिल्लाई, अनुपमा ताकमोघे, स्वाती पानसरे व इतर आहे.


Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma