मी मराठी वर 'प्राजक्ता'

वाहिन्यांच्या रेलचेलमध्ये आजही 'मी मराठी' वाहिनी आपले वेगळेपण टिकवून आहे. नाविन्याचा ध्यास घेतलेल्या 'मी मराठी' वाहिनीने प्रेक्षकांनाही त्याची अनुभूती वेळोवेळी दिली आहे. विषयांचे वैविध्यपूर्ण सादरीकरण, नाविन्यपूर्ण कथानक, मातब्बर दिग्दर्शक त्याचबरोबर कुशल तंत्रज्ञ यामुळे रंगलेल्या विषयसंपन्न मालिकांमुळे 'मी मराठी' ने कायम आपले वेगळं अस्तित्त्व निर्माण केलं आहे.
आपल्या मालिकांद्वारे 'मी मराठी' वाहिनीने नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीला प्राधान्य दिलं असून त्यांची एक नवीन मालिका २२ फेब्रुवारीपासून सोम. ते शुक्र. संध्याकाळी ७.३० वा. छोटया पडद्यावर दाखल होत आहे. 'प्राजक्ता' या मालिकेच्या निमित्ताने कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या दर्जेदार मालिकेची निर्मिती होत आहे. प्राजक्ताचे फुलं ज्याप्रमाणे दुसर्‍यांच्या अंगणात पडून सुवास देतं तशीच नातेसंबंधातील व्यक्तिरेखांचे विविध कंगोरे 'प्राजक्ता' मालिकेत लेखक जयेश पाटील यांनी रेखाटले आहेत. 'यु टीव्ही टेलिव्हिजन' सारख्या नामांकित कंपनीने या मालिकेची निर्मिती केली आहे. 'प्राजक्ता' मालिकेची कथा जयेश पाटील यांनी लिहीली असून पटकथा- संवाद लेखक त्रिलोक्य व जितेंद्र देसाई यांनी लिहीली आहे. या मालिकेचे दिग्दर्शन संजय सावित्री करीत असून छायाचित्रण अजय चौहान यांचे आहे. नातेसंबंधातील अनोख्या जिव्हाळा, कडू-गोड प्रसंग यांचा सुरेख मिलाप या मालिकेद्वारे प्रेक्षकांना अनुभवता येईल.'मी मराठी' च्या 'प्राजक्ता' मालिकेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनुभवी कलाकारांसोबत नवोदित कलाकारांचा अभिनय पहायला मिळणार आहे. यात सुलभा देशपांडे, सतीश पुळेकर, माधवी गोगाटे, अभिजीत चव्हाण, सुचित्रा बांदेकर यांच्या सोबत अजिंक्य जोशी, राहुल पेठे, रश्मी पाटील, तेजस्विनी पाटील, सुहास खांडके, जयवंत पाटेकर यांच्या भूमिका पहायला मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA