रिकी कैसेटची धमाल कोळीगीतांची व्हिसीडी गोमू चालली बाजाराला

रिकी कैसेट कंपनी ने महाराष्ट्रातील संगीत सरिकांची नेमकी आवड लक्षात घेऊन एकाहून एक सरस कोळीगीतांच्या व्हिसीडी उपलब्ध करुन दिल्या आहेत. नुकचीत त्यांनी गोमू चालली बाजाराला ही धमाल कोळीगीतांची व्हिसीडी बाजारात आणली आहे.
प्रियांक शाह प्रस्तुत गोमू चालली बाजाराला या व्हिसीडीमधील हे शीर्षकगीत शब्द आणि धमाल चालीमुळे लक्षवेधी ठरलं आहे. तसेच डोलीला गेलेय नाखवा राजा, ये ये घे दादा घे, झुक झुक गाडी निघाली, करवली हरवली लग्नामधी, मना झोरीली, गाजा वाजा झयला, शिमगा उगावला, लाराची लेक, आई गावदेवी माऊली ही गीतंही कर्णमधूर आणि डोळयांच पारणं फेडणारी आहेत. या गीतांना उत्तरा केऴकर, एकनाथ धयाऴकर, वैजयंती लिमये, संगीता मोहिते, विठ्ठल हेदुकर, सुरेंद्र सुमन, रामदास पाटील, शकुंतला जाधव, संतोष नायक, सारिका केऴशीकर, वासुदेव मकादम यानी आवाज दिला आहे. रिकी कैसटची ही व्हिसीडी ४५ रुपयांस सर्वत्र उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर