मी मराठीवर 'ब्रम्हांडनायक गण गण गणात बोते'

संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या भक्तिचा महिमा अगाध आहे. सर्वदूर पसरलेल्या लाखो भक्तांचे शेगांवचे गजानन महाराज श्रद्धास्थान आहेत. 'मी मराठी' वाहिनीवरील 'कृपासिंधू, भिऊ नकोस. . . मी तुझ्या पाठीशी आहे' या स्वामी समर्थावरील मालिकेला प्रेक्षकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद पाहून 'ब्रम्हांडनायक' ही गजानन महाराजांच्या जीवनावर आधारीत नवीन मालिका 'मी मराठी'वर दाखल होत आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतीसाठी भक्तीमार्ग हाच एकमेव उपाय ठरत आहे हे जाणून 'मी मराठी'च्या उपाध्यक्षा श्रीमती हरिना चंदन यांनी या कथा आशयाची मालिका आपल्या वाहिनीवर दाखविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या उपक्रमाचे देखील रसिक प्रेक्षक तितक्याच आत्मीयतेने स्वागत करतील असा विश्वास त्यांना वाटतो. २२ फेब्रुवारीपासून आठवडयातील दर सोमवार, मंगळवार रात्री ९.०० वाजता 'ब्रम्हांडनायक' ही नवीन मालिका प्रक्षेपित होणार आहे.
शेगाव येथे प्रगट झालेल्या गजानन महाराजांचा तेथे ३२ वर्षाचा कार्यकाळ होता. 'गण गण गणात बोते' ची शिकवण देणार्‍या गजानन महाराजांनी शेगावमध्ये अनेक चमत्कार केले. अनेक समाजपयोगी कामे करणार्‍या गजानन महाराजांची शिकवण आजही सर्वांना उपयुक्त व मोलाची ठरत आहे. 'ब्रम्हांडनायक गण गण गणात बोते' ह्या मालिकेद्वारे महाराजांचे कार्य सर्वसामान्य व तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचावे हा या मालिकेच्या निर्मितीमागचा हेतू आहे. या मालिकेद्वारे मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. ही मालिका फक्त महाराजांनी केलेल्या चमत्कारांचे चित्रण करणार नाही तर महाराजांचा जीवनपट गोष्टरुपात उलगडून दाखवणार आहे. गजानन महाराजांनी सर्वधर्मसमभावाची दिलेली शिकवण, 'गण गण गणात बोते' हा मंत्र, त्यांनी दाखवलेली भक्तीमार्ग याची निस्सीम गरज आज समाजाला आहे.
२२ फेब्रुवारीपासून 'मी मराठी'वर सोमवार, मंगळवार रात्री ९.०० वा. दाखविण्यात येणारी 'ब्रम्हांडनायक' मालिका महाराष्ट्रातल्या सर्व वयोगटातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होईल यात शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA