मी मराठी वर 'मालगुडी डेज'

'ता ना ना ना. . . ना ना ना ना ना. .' हे शब्द ऐकले की हमखास आठवण होते ती 'मालगुडी डेज' या मालिकेची. आतापर्यंत कोणत्याही मालिकेला मिळाली नसेल तितकी लोकप्रियता प्रख्यात लेखक आर. के. नारायण यांनी लिहिलेल्या कादंबरीवरील या मालिकेला मिळाली होती. बर्‍याच वर्षांपूर्वी छोटया पडद्यावर प्रसारीत झालेली ही मालिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. 'मी मराठी' वाहिनीने प्रेक्षकांची अभिरुची ओळखून 'मालगुडी डेज' मालिका आता मराठीत आणली आहे.
२२ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या वृंदावन, प्राजक्ता यामालिकेसोबत 'मालगुडी डेज' ही मालिका सोम. ते शुक्र. रात्री ८.०० वा. दाखविण्यात येणार आहे. 'मालगुडी डेज' या मालिकेतला निरागस स्वामी, त्याच्या मित्रांचा कंपू, त्यांनी केलेल्या गमतीजमती आणि ते गावातलं वातवरण सारं काही पुन्हा पुन्हा पहावं असं. आता तेच प्रेक्षकांना आपल्या मराठी भाषेत पाहायला मिळणार आहे.
१९३५ साली आर. के. नारायण यांनी 'मालगुडी' नावाच्या काल्पनिक गावाला केंद्रस्थानी ठेवून 'स्वामी ऍण्ड फ्रेण्डस' नावाची आपली पहिली लघुकथेची मालिका लिहीली. त्यानंतर नारायण यांनी एकापाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. अतिशय साध्या कथांवरील 'मालगुडी डेज' मालिका प्रेक्षकांना खूपच आवडली. प्रत्येकवेळी ही मालिका पाहताना प्रेक्षकांना आपल्या गावाची अनुभूती देते. तेव्हा सज्ज व्हा 'मालगुडी डेज' 'मराठीत पहायला.
२२ फेब्रुवारीपासून 'मी मराठी'वर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.०० वा. 'मालगुडी डेज' प्रसारीत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA