साम वाहिनीवर भैरोबा

कुंडली सारख्या गाजलेल्या मालिके नंतर पीएमआय एंटरटेन्टमेंट इंडिया प्रा. लि. च्या बैनरखाली भैरोबा ही कौंटुंबिक पण विनोदी मालिका साम मराठी वाहिनी वर मंगलवार दि. २३ फेब्रुवारी पासून सोम ते शनि सायंकाळी ७.३० वाजता प्रसारीत होणार आहे. मनीष पटाडीया व अजय पटाडीया यांनी भैरोबा ची निर्मिती केली आहे.
मालिका भैरोबा च्या कथानका नुसार अजय नाईक हा प्रतिष्ठित उद्योगपती व्यवहाराने आणि घड्याळ्याच्या काट्या प्रमाणे चालणारा माणूस त्याचा स्वताच्या कर्तुत्वार विश्वास, देवावर त्याचा विश्वास नाही. स्वकष्टाने ही सर्व काही मिळवलेले. त्यांची देवाभोळी पत्नी अंजली व दोन मुले व दोन मुली आणि आजी असे कुंटुंब. पत्नि अंजली आपल्या कुंटुंबासह भैरोबा चा नवस फेडण्यासाठी गावी येतात. भैरोबा गावच जागत देवस्थान. त्याच उघड्या माळराना वरच अर्धगोलकार देऊळ. पण ती जागा आहे अजय नाईक यांची ग्रामस्थ देवाच्या जिर्णोध्दार बाबत नाईकांशी चर्चा करण्याच ठरवतात. नाईक ती जमीन विकण्याच्या विचारात पण ती जमीन जाते का... भैरोबा चा कोप होतो का... अजय नाईकांच्या कुंटुंबाच काय होत... अशी ही भैरोबा ची कथा विनोदी ढंगाने मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आणली आहे.
ह्या मालिकेतील मुख्य कलाकार मोहन जोशी, वंदना वाकनीस, गौरी सुखटणकर, रुचा हसबनीस, स्वप्नील फडके व इतर आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर