विज्ञान आणि श्रद्धा यांची सांगड घालणारा चित्रपट जावई माझा नवसाचा

जावई माझा नवसाचा या चित्रपटाची कथा आहे एका खेळकर पण बौद्धिक वाढ खुंटलेल्या एकवीस बावीस वर्षाच्या तरूणीची. आपली मुलगी बरी व्हावी म्हणून तिचे आईवडील सर्व परीने उपचार करतात. पण त्याचा काही फायदा होत नाही. त्यानंतर तीच्या आयुष्यात जे उत्कंठावर्धक बदल घडतात ते या चित्रपटात पहायला मिळतील. स्त्री मनाचा ठाव घेणारी ही कथा एका सामाजिक विषयाला स्पर्श करणारी आहे.
ह्या चित्रपटातील मुख्य कलाकार तेजा देवकर, संतोष जुवेकर, उषा नाईक, ईला भाटे, उदय सबनीस, अभिजीत चव्हाण, लवराज कांबळी व इतर आहेत.
Comments