टाटा, बिर्ला आणि लैला येताहेत....
प्रॉपर्टीवरून होणारे वाद चित्रपटाचा विषय असणे हे काही नवीन नाही पण विनोदाच्या अनुंषगाने मांडणे हे मात्र नवीन आणि तितकेच आव्हानात्मक आहे. याच पार्श्वभूमिवर आधारलेला एक धमाल मराठी चित्रपट आकारास येत आहे. टाटा, बिर्ला आणि लेला असे विनोदी शीर्षक असणारा हा चित्रपट प्रेक्षकांची मनमुराद करमणूक करणारा ठरणार आहे, कारण यात विनोदाचे अचूक टायमिंग असलेले हरहुन्नरी अभिनेते अशोक सराफ आणि भरत जाधव एकत्र आहे. त्याच बरोबर शीतल जाधव, मोहन जोशी, रविंद्र बेर्डे, विजय चव्हाण, विजय गोखले, उषा नाईक, अरूण कदम, डॉ. विलास उजवणे व इतर आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबई व कोल्हापुरात झाले आहे.
पैशा साठी माणूस कुठच्याही थराला जाऊ शकतो याचे चित्रण विनोदी अंगाने टाटा, बिर्ला आणि लैला या चित्रपटात लवकरच पहायला मिळणार आहे.
पैशा साठी माणूस कुठच्याही थराला जाऊ शकतो याचे चित्रण विनोदी अंगाने टाटा, बिर्ला आणि लैला या चित्रपटात लवकरच पहायला मिळणार आहे.
Comments