काय करू न कसं करू चे चित्रिकरण पूर्ण

प्यार किया नहीं जाता, हो जाता है असं म्हणतात. नकऴत कधीतरी, कुठेतरी, कुणीतरी आपल्या हदयाच्या कोप-यात घरं करू लागतं, त्यांच्या किंवा तिच्या विचारांनी मनं घेरून जातं मगं कुठं ध्यानात येतं कि आपण प्रेमात पडलोय. पण अलीकडे हे प्रेम करण्याची पद्धतच बदलून गेलीय. ठरवून प्रेम करण्याचा एक नवा ट्रेँड सेट होतोय. मेहनत करून पैसा मिऴविण्यापेक्षा श्रीमंत मुलीशी लग्न करण्याची अनोखी शक्कल लढवली जातेय. यात मुलीही काही मागे नाहीत. पण समजा श्रीमंत असल्याच्या गैरसमजातून असं एखादं लग्न झालं तर काय होईल... अर्थातच धमाल येईल. याच आशयाच्या कथानकावर आगामी काय करून कसं करू हा विनोदी मराठी चित्रपट आकारास आला आहे.
जी वी फिल्म्स च्या हेमांगी राव यांनी या धमाल विनोदी चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन विनय ए लाड यांचे आहे. भरत जाधव, दिपाली सैय्यद, पुष्कर श्रोत्री, आदीती सारंगधर, विजय चव्हाण, उमा सरदेशमुख, ज्योती जोशी या मराठीतीली लोकप्रिय कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून अशोक शिंदे पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर