भव्य मराठी एतिहासिक चित्रपट राजमाता जिजाऊ
मराठी चित्रपटांत आता ख-या अर्थाने प्रयोग होत आहेत असे म्हणावे लागेल. कारण सध्याच्या आधुनिक युगात एतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणे हे एक धाडसच म्हणावे लागेल. नगर जिल्हातील सौ मंदाताई शरदराव निमसे, आपल्या जिजाई चित्र, शिर्डी या चित्रपट निर्मिति संस्थेअंतर्गत - राजमाता जिजाऊ या एतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत आहेत. नुकतीच चित्रपटाचे दिग्दर्शक यशवंत भालकर, निर्मात्या सौ. मंदाताई निमसे, शरदराव निमसे, जिजाऊंची भूमिका साकारणा-या प्रा.डॉ. स्मिता देशमुख यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेतली. यावेऴी निर्मिती संस्थेमार्फत राष्ट्रपतींना राजमाता जिजाऊंचे स्मृतीचिन्ह देण्यात आले.
Comments