घमेंडखोर कलाकारांना लागला बॉयकॉटचा शाप
सध्याचा सिने दर्शक इतका जागृत झाला आहे की त्यामुळेच बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीत बॉयकॉटचा नवा टेन्ड सुरू झाला आहे. आजच्या आधुनिक युगातील दर्शक लगेच आपली प्रतिक्रिया देत असल्यामुळे घमेंडखोर कलाकारांना चांगलाच चोप बसला आहे. त्यामुळेच सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वीच दर्शक फिल्म विषयी सर्व माहिती मिळवितो व त्यावर आधारित आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर लिहितो. त्यामुळेच ख-या अर्थाने घमेंडखोर कलाकारांचे चित्रपट बॅाक्स आफिसवर आपटत चालले आहेत आणि त्याचा खामियाचा निर्माता भोगतो.
वरिष्ठ फिल्मी पत्रकार म्हणतात की बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही कलाकार तर इतके घमेंडखोर आहेत की चित्रपटाच्या बजेट इतकं मानधन घेतात. त्यामुळेच सिनेमाचा बजेट वाढतो व सिनेमा आपटला की त्या घमेंडखोर कलाकारांना निर्माता पुढिल सिनेमात घेत नाही व इतरही मोठ्या बैनरचे निर्माते अशा घमेंडखोर कलाकारांना कायमचाच बाय-बाय करतात.
Comments