बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्र फ्लॉप...

शंकर मराठे, मुंबई - ११ सप्टेबर २०२२ : "ब्रह्मास्त्र पार्ट १ शिवा" हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या तीन दिवसातच कमजोर साबित झाला आहे. देशी व विदेशी मधील एकूण कमाई २४० करोड रुपये झाली आहे तर ह्या सिनेमाचा बजेट व रिलीजचा खर्च पकडून जवळपास ६०० करोड रुपये झाला आहे.

भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटावर खूप मेहनत घेतली गेली असली तरी, बराच काळ पैसा पाण्यासारखा वाहून गेला आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असे वाटले होते, परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याची खात्री पटली आहे. दर्शकांनी ह्या सिनेमाकडे पाठ फिरवली आहे.

अधिकतम चित्रपट समिक्षकनी ह्या सिनेमाला ५ पैकी २ रेटिंग देऊन इज्जत काढली आहे. हा चित्रपट वरून चकचकीत पण आतून पोकळ आहे. कथानकात दम नाही तर संवाद फारच पोकळ  व कमकुवत स्वरूपाचे आहे.

ब्रह्मास्त्र मध्ये दर्शकांना बांधून ठेवण्याची क्षमता नाही आहे. डायरेक्टर बनवायला गेला हिंदी सिनेमा आणि बनली भोजपुरी फिल्म.

मुंबई मधील सिने पत्रकारांनी म्हटलं आहे की अखेर चित्रपट ब्रह्मास्त्र फ्लॉप झाला आहे. दिग्दर्शकाने सिनेमा बनवला खरा परंतु कथानक, कलाकारांचा अभिनय, संवाद यांच्या मध्ये काहीच तालमेल नाही आहे. स्र्कीप्टीग तर फारच कमजोर आहे. VFX जबरदस्त केल्यामुळे फक्त सिनेमाचा बजेट वाढला आहे. चित्रपटाला काहीच फायदा झालेला नाही.

चित्रपटाची खरी कमाई पहिल्या तीन दिवसातच असते व त्यानंतर काही केले तरी कमाई होत नाही.

दिग्गज कलाकारांनी बनलेला व करोडो रुपयांचा खर्च करून शेवटी ब्रह्मास्त्र हा सिनेमा तर फ्लॉपच झाला.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर