'सिम्पली सई' सूरांनी बहरलेली
शंकर मराठे, पुणे - २१ सप्टेबर २०२२ : कोथरूडच्या शाकुंतल हॉलमध्ये 'सिम्पली सई' या सांगीतिक मेहफिलीचा पहिला प्रयोग रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. प्रसिद्ध गायिका सई टेंभेकरने या वेळी स्वतःची अनेक नवीन गाणी आणि याचबरोबर हिंदी-मराठी तसेच वेस्टर्न संगीत विश्वातील अजरामर गीतांना उजाळा दिला. कवी ग्रेस, भा.रा.तांबे, कुसुमाग्रज, शांता शेळके यांच्या कविता सादर झाल्या, मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातली अनेक पाने यानिमित्ताने उलगडली गेली. कविता आणि गायन यांची गुंफण रसिकांनी अनुभवली. दर्दी रसिकांच्या गर्दीने कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेला. कार्यक्रमाचं निवेदन आरजे सानिका मुतालिकने केले तर साथसंगत राधिका अंतुरकर, दीप्ती कुलकर्णी आणि डॉ.यश कूर्मीने केले. सई टेंभेकर युट्युब चॅनेलच्या माध्यमातून याची झलक रसिकांना पाहता येईल आणि लवकरच अनेक शहरात याचे प्रयोग होण्याचे योजिले आहे.
Comments