शिवरायांच्या भूमिकेत सुबोध भावे
शंकर मराठे, मुंबई - ७ सप्टेबर २०२२ : छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की आठवतं त्यांचं रूप, त्यांचा प्रताप आणि मनात डोकावून जातात त्यांच्या असाधारण शौर्यकथा...
तो दरारा, तो रूबाब, त्यांची अखंड हिंदवी स्वराज्याची संकल्पना आणि ती सत्यात उतरवताना केलेल्या लढाया...
झी स्टुडिओज् अभिमानाने सादर करीत आहे, शिवरायांच्या भूमिकेत अष्टपैलू अभिनेता सुबोध स. भावे. येत्या दिवाळीत संपूर्ण भारतात घुमणार स्वराज्याचा महामंत्र, आपल्या शिवरायांची शिवगर्जना 'हर हर महादेव' ते ही पाच भाषांमध्ये.
Comments