हास्य कलाकार विजय राज वर विनयभंग केल्याचा आरोप
Shankar Marathe, Mumbai - 3 November, 2020 : हास्य कलाकार विजय राज यांनी सहकारी स्टाफ असलेल्या 30 वर्षीय युवतीची छेडछाड केल्याने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीसांनी काल रात्री त्यांना अटकही केली आहे. अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या शेरनी चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या दरम्यान मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात व गोंदियातील हॉटेल गेटवे येथे विजय राज यांनी पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेरनी चित्रपटाचे सर्व कलाकार व स्टाफ गोंदियातील हॉटेल गेटवे येथे मागील १५ दिवसांपासून राहत होते. सिनेमाच्या चित्रिकरणाच्या वेळी व हॉटेलमध्ये अभिनेता विजय राज यांनी आपल्या स्टाफमधील मुलीची छेड काढली, असा आरोप आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354 (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज यांना अटक केली आहे.
Comments