शेमारू मराठीबाणावर पहा ४ धम्माल चित्रपट
शंकर मराठे - मुंबई, २० नोव्हेंबर २०२०: उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची रेलचेल असलेली शेमारू मराठीबाणा ही महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीची मराठी सिने वाहिनी ठरली आहे. या वर्षी सर्वच संकल्पना बदलल्या आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला जाणवले आहे. घरच्यांसोबत मनोरंजक चित्रपट पाहणे याला यंदाच्या वर्षी अनन्यसाधारण महत्त्व मिळाले आहे, शेमारू मराठीबाणाने एकापेक्षा एक छान चित्रपट दाखवून कौटुंबिक नाती आणि मनोरंजनाचे बंध अधिकच दृढ केले आहेत. सणासुदीच्या काळात सर्वत्र निर्माण झालेला उत्साह असाच पुढे कायम रहावा यासाठी या वाहिनीने नोव्हेंबर महिन्यात रोचक, मनोरंजक चित्रपटांची मेजवानी आयोजित केली आहे.
या नवीन चित्रपटांमुळे तुमचे सुट्टीचे दिवस धम्माल मनोरंजनाने भरलेले असतील हे नक्की! सिनेसृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार महेश मांजरेकर, मृणाल ठाकूर, सिद्धार्थ चांदेकर आणि इतर अनेकांना वेगवेगळ्या नामी भूमिकांमध्ये पाहणे ही सिनेरसिकांसाठी पर्वणी ठरेल. विनोदी, नाट्यमय, रोमान्स अशा विविध प्रकारचे चित्रपट यामध्ये असल्यामुळे घरातील प्रत्येकाची आवडनिवड पूर्ण होईल.
२१ नोव्हेंबर दुपारी १२ वाजता पहा 'मसाला' या विनोदी, नाट्यमय कथेचा नायक रेवण एक व्यावसायिक आहे ज्याने आजवर आयुष्यात अनेक नकार झेललेत. आता नवा व्यवसाय सुरु करण्याच्या उमेदीने तो आपल्या बायकोसोबत शहरात आलाय. अर्थात इथे सुद्धा अडचणी त्याचा पिच्छा सोडत नाहीत. रेवणची ही कथा जितकी हसवते तितकीच हृदयाला भिडते. अतिशय गुणी अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या विविध अभिनय छटांनी हा चित्रपट वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. ज्योती सुभाष आणि इतरांनी आपल्या उत्तम अभिनयाने हा चित्रपट मोहक सजवला आहे. "मसाला" मेजवानीचा आस्वाद घेणाऱ्यांना निखळ आनंद नक्कीच मिळेल.
२२ नोव्हेंबर दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता - 'थँक यु विठ्ठला' सर्वांचे लाडके आराध्य दैवत साक्षात विठ्ठल जेव्हा अवतरते तेव्हा काय होते हे या सिनेमामध्ये अतिशय मजेशीर आणि मनोरंजक पद्धतीने मांडले आहे. आयुष्याला कंटाळलेल्या एका माणसाला एके दिवशी विठ्ठल भेटतो आणि त्याचे आयुष्य आमूलाग्र बदलून जाते. जीवनाचा एक वेगळाच अर्थ विठ्ठलाकडून त्याला शिकायला मिळतो. मकरंद अनासपुरे आणि महेश मांजरेकर या दोन अतिशय लोकप्रिय कलाकारांची जोडी या चित्रपटात असल्याने कुटुंबासोबत छान वेळ घालवण्यासाठी हा सिनेमा नक्की पहा.
२८ नोव्हेंबर दुपारी १२ वाजता - 'सुराज्य' अतिशय हृदयस्पर्शी अशा या कथेचा नायक ओंकारला (अभिनेता वैभव तत्त्ववादी) जाणवते की त्याच्या गावात रुग्णालय नाही. आपली मित्रमंडळी बंड्या (अभिनेता श्रीराम पत्की) आणि डॉ. स्वप्ना (अभिनेत्री मृणाल ठाकूर) यांच्या मदतीने तो गावात वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याचे ठरवतो.
२९ नोव्हेंबर दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता - 'ऑनलाईन बिनलाईन' क्लासिक म्हणावा असा हलका-फुलका, निखळ मनोरंजन देणारा हा सिनेमा आहे. 'रोमान्स' आणि 'डिजिटल जगाचे व्यसन' या संकल्पनांवर बेतलेला हा चित्रपट खास युवापिढीसाठी बनवला गेला आहे. इंटरनेटचे भलतेच व्यसन जडलेला नायक सिद (अभिनेता सिद्धार्थ चांदेकर) किमयावर (अभिनेत्री ऋतुजा शिंदे) प्रेम करतो पण व्हर्च्युअल दुनियेच्या बाहेर येऊन तिच्याशी कसे बोलायचे, कसे वागायचे ते मात्र त्याला समजत नाही. पण जेव्हा त्याचा मित्रच किमयाच्या प्रेमात पडतो तेव्हा मात्र तो त्याला मागे सरण्यात काहीच कसूर करत नाही. सिद किमयाचे मन जिंकण्याची किमया कशी करतो हे पाहणे खूपच रोचक ठरेल. पुरेपूर मनोरंजनाची पक्की खात्री असलेला हा सिनेमा पाहायलाच हवा.
Comments