अक्षय कुमार चा पहिला चित्रपट 'सौगंध' पासून बैकग्राउंड म्यूजिक देणारे राजू सिंह चा 'केसरी' पर्यंतचा प्रवास.

ज्याप्रमाणे चित्रपटांत संगीतकारांचे महत्व असते, त्याचप्रमाणे त्याच सिनेमाला बैकग्राउंड म्यूजिक देणा-याला देखील तेवढेच महत्व असते. राजू सिंह ची ओळख बैकग्राउंड म्यूजिक चे मास्टरच्या रुपात होती. बॉलीवुड मधील कित्येक सिनेमाला त्यांनी बैकग्राउंड म्यूजिक देऊन आपली प्रतिभा दाखविली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला अक्षय कुमार चा चित्रपट 'केसरी' च्या बैकग्राउंड म्यूजिक मुळे चर्चेत आलेला राजू सिंह ने संगीत दिग्दर्शक म्हणून देखील काही सिनेमातील हिट गाणी कम्पोज केली आहेत.

राजू सिंह जवळ-जवळ तीन दशकांपासून सतत संगीत क्षेत्रात काम करत आहे. कधी त्यांनी काही अन्य म्यूजिक डायरेक्टर साठी गिटारिस्ट बनून, तर कधी ड्रमर बनून आपली सेवा दिली आहे. बालपणापासून संगीताची आवड बाळगणा-या राजू ने १९८३ मध्ये ‘वारिस’ चित्रपटांत लता मंगेशकर यांच्या एका गाण्यात गिटार वाजविली होती. उत्तम सिंह यांनी पहिली वेळ त्यांना संधी दिली होती. त्यानंतर अमर हल्दीपुर सोबत काम केले आणि नंतर आर डी बर्मन कैंप सहभागी होऊन संगीत क्षेत्रातील सर्वकाही आत्मसात केले. ‘म्यूजिशियनच्या रूपात मी काही संगीतकारां बरोबर काम केले आहे. पंचम दा आरडी बर्मन सोबत गिटारिस्ट म्हणून काम केले आहे. त्यानंतर आनंद मिलिंद, नदीम श्रवण, वीजू शाह, अनु मलिक सोबत म्यूजिशियन म्हणून काम केले. या दरम्यान सीरियल "बनेगी अपनी बात" साठी बैकग्राउंड म्यूजिक देण्याची ऑफर मिळाली. नंतर मला मुझे विनोद खन्ना स्टारर चित्रपट ‘कारनामा’ साठी बैकग्राउंड स्कोर करण्यासाठी पहिली वेळ संधी मिळाली. त्यानंतर मी कधेच मागे वळून पाहिले नाही. मला देखील वाटले कि अन्य म्यूजिक डायरेक्टर साठी फक्त गिटार वाजविण्या पेक्षा आपली एक वेगळी ओळख बनविली पाहिजे. आणि अशा प्रकारे बैकग्राउंड म्यूजिक देण्यासाठी फारच व्यस्त होत गेलो. अक्षय कुमार चा पहिला चित्रपट 'सौगंध' चे बैकग्राउंड म्यूजिक मीच दिले आहे.

सैनिक, मिस्टर बांड, सबसे बड़ा खिलाडी, खिलाडियों का खिलाडी सारखे अक्षय कुमार यांच्या काही सिनेमांना बैकग्राउंड म्यूजिक मीच दिले आहे. त्यानंतर आता अक्षय सोबत मला 'केसरी' सारखा मोठा सिनेमा करण्याची संधी मिळाली.  १९९६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘खिलाडियों का खिलाडी’ च्या २३ वर्षा नंतर अक्षय सोबत ‘केसरी’ सिनेमात काम केले आहे.’

अक्षय कुमार चा चित्रपट 'केसरी' बद्दल माहिती देताना राजू सिंह सांगतो कि अधिकांश चित्रपट बैकग्राउंड म्यूजिक साठी आमच्याकडे शूटिंग व एडिटिंग नंतर येतात. परंतु ‘केसरी’ ची शूटिंग सुरु होण्यापूर्वी मी ह्या मूवी बरोबर जोडलो गेलो. मी ह्यातील काही सीन साठी बैक ग्राउंड म्यूजिक त्या सीनच्या शूटिंगच्या पहिलेच कम्पोज केले होते. आज सिनेमाच्या यशाने फारच आनंद होत आहे. चित्रपटांने शंभर कोटी पेक्षा जास्त बिजनेस केला आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.


चित्रपटांत बैक ग्राउंड संगीत बदलत्या परिदृश्यांबद्दल राजू सिंह चे मत फारच महत्वाचे आहे, ‘जर मागे वळून पाहिले तर पहिले सिनेमांचे बैक ग्राउंड म्यूजिक फारच लोकप्रिय होत असे, त्याचे एक कारण होते कि जो संगीतकार चित्रपटांसाठी गाने क्रिएट करत असे, तोच त्याचे बैक ग्राउंड संगीत देखील देत असे. संगीतकाराला माहित असे कि चित्रपटांतील गाणी व त्याची धून कोणत्या सिचुएशन वर वापरता येईल. मी देखील बैक ग्राउंड म्यूजिक देते वेळी ह्या गोष्टीवर विशेष लक्ष देतो कि दर्शकांना हे समजलेच पाहिजे नाही कि ह्याचे म्यूजिक कोणीतरी दुस-याने कम्पोज केले आहे, परंतु ह्याचे बैक ग्राउंड म्यूजिक वेगळे आहे कारण मी काही ठिकाणी गाण्याची धुन देखील वापरतो.’

चित्रपटांत गाणी कम्पोजरच्या रूपात देखील राजू सिंह ने काम केले आहे, परंतु इतके कमी का? त्याचे कारण सांगताना ते म्हणतात कि जी हां, मी फारच कमी गाणी कम्पोज केली आहे. संगीतकार म्हणून माझा सिनेमा 'राज़ २'  होता, त्यातील गाणं 'सोनियो' फारच लोकप्रिय झाले होते. बैक ग्राउंड संगीतासाठी मी जास्त वेळ देतो, म्हणूनच मला कम्पोजर म्हणून काम करण्यासाठी वेळच मिळत नाही, परंतु बैक ग्राउंड कम्पोजर म्हणून मी काम करताना फारच एन्जॉय करत आहे आणि निर्माता-दिग्दर्शकांना माझ्या हयाच क्वालिटी वर मोठा विश्वास आहे.’

राजू सिंह ने बैक ग्राउंड संगीतकार म्हणून आतापर्यंत १४० चित्रपट केले आहे, तर १२-१३ सिनेमांना म्यूजिक डायरेक्टर च्या रुपात काम केले आहे. त्यांचे येणारे नविन प्रोजेक्ट्स आहेत सनी देओल चा चित्रपट 'पल पल दिल के पास',  महेश भट्ट चा ' सड़क २' आणि मोहित सूरी चा 'मलंग'.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर