महाराष्ट्रातील प्रत्येक नर्स ने पहावा असा आहे चित्रपट ‘जाणिवा’
एंजेल
प्रोडक्शन आणि ब्लू ऑय प्रोडक्शन द्वारा प्रस्तुत आणि निर्माता मिलिंद विष्णु, अरविंद कुमार, रेश्मा विष्णु आणि
सरमन जैन यांचा चित्रपट ‘जाणिवा’ ३१ जुलाई रोजी सर्वत्र रिलीज झाला आहे. दर्शकांनी
भावनात्मक दृष्टिकोनातुन चित्रपट ‘जाणिवा’ पसंत केला आहे.
मराठी
चित्रपट ‘जाणिवा’ ची निर्मिती करण्याची प्रेरणा अरुणा शानबाग च्या घटनेतुन मुळे मिळाली.
चित्रपट ‘जाणिवा’ हे परिपूर्ण चित्र
आहे, जर कोणा एका व्यक्ति वर अन्याय झाला असेल, तर त्याला न्याय देता येतो. चित्रपट ‘जाणिवा’ मध्ये आसावरी पाटील ह्या युवती वर बलात्कार
होऊन देखील अन्याय झालेला असतो. अरुणा शानबाग ची घटना देखील अशीच होती व तेव्हा
देखील अशा प्रकारचा प्रश्न उभा झाला होता. म्हणूनच हा चित्रपट ‘जाणिवा’ ख-या अर्थाने अरुणा शानबाग यांना परिपूर्ण
अशी श्रंद्धाजली आहे.
चित्रपट
‘जाणिवा’ हा आता संपूर्ण
महाराष्ट्रातील म्हणजेच मुंबई, ठाणे,
नवी मुंबई, रायगड, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कराड, विटा, तुळजापुर, बारामती, अक्कलकोट, कोल्हापुर, सोलापुर, इंचलकरंजी, नागपुर, अमरावती, अहमदनगर, खेड, मंचर, नारायणगांव, शिर्डी, रत्नागिरी, चिपळूण, अलिबाग, औरंगाबाद, जळगांव, वर्धा, धुळे, पंढरपुर येथील नर्स ला दाखविला जाणार आहे.
चित्रपटाचे
दिग्दर्शक राजेश रणशिंगे आहे. चित्रपटात सत्या मांजरेकर ने मुख्य भूमिका साकारली
आहे आणि नवोदित कलाकार वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दानी, संकेत अग्रवाल व त्याचबरोबर किरण करमरकर, रेणुका शहाणे, अतुल परचुरे, इंदिरा कृष्णन, उषा नाडकर्णी, किशोर कदम आहे. पाहुणे कलाकार महेश मांजरेकर देखील आहेत.
Comments