दक्षिणात्य संगीताच्या आयटम सॉंग मध्ये हेमलता बाणे आणि विजय पाटकर



आयटम सॉंगच्या बाबतीत आजकाल बॉलीवूडला तोडीच तोड स्पर्धा मराठी चित्रपट देत आहेत. बहुतांश मनोरंजक चित्रपटाचा युएसपी ठरणाऱ्या चित्रपटातील एखाद्या आयटम सॉंगमुळे प्रेक्षक आकर्षित झाल्याची अनेक उदाहरण पहायला मिळतात. अतिशय मोहक आणि ठसकेबाज नृत्यप्रकारात एकूण एक अभिनेत्रींनी आपली अदाकारी दाखवली आहे. यात एक वेगळी भर पडते आहे ती दक्षिण्यात आयटम सॉंगची. ग्लोबल मिडिया कॉर्पोरेशन व श्री यंत्रा इंटरनेशनल प्रस्तुत माझ्या नवऱ्याची बायको या आगामी धमाल विनोदी चित्रपटात धमाल डान्सर व प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर आणि मराठी चित्रपटाची उगवती मोहक अभिनेत्री हेमलता बाणे याच्यावर दक्षिण्यात संगीत असलेले आयटम सॉंग चित्रीत करण्यात आले आहे. हिंदी आणि भोजपुरीतले प्रसिद्ध कोरिओग्राफर सुनील मोतवाणी यांनी कोरिओग्राफी केली आहे.

लहानपणापासून नेहमी खरे बोलावे असा सुविचार सांगण्यात येतो. मात्र त्याचे तंतोतंत पालन करणारे फार विरळ असतात. मात्र विरळ असलेली खरे बोलणारी माणस खोटं बोलायला लागली की आपसूकच त्यांना येणाऱ्या संकटाला सामोरे जावं लागतं. असा हा खर्यापासून खोट्या पर्यन्तच्या हास्यस्फोटक प्रवासाचे सुंदर चित्रण मनोरंजनात्मक दृष्टीकोनातून दाखवण्याचा प्रयन्त लेखक– दिग्दर्शक अशोक कामले यांनी या चित्रपटातून केला आहे. या चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध केलंय कृष्णा मोहन यांनी तर छायाचित्रण आहे नजीब खान याचं. अशोक कामले आणि मोहन पिपळे यांची निर्मिती असलेल्या माझ्या नवऱ्याची बायको या चित्रपटात भरत जाधव,दिपाली सय्यद, स्मिता गोदकर, पंकज विष्णू, पंढरीनाथ कांबळे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, नयना आपटे, विजय चव्हाण, आनंदा कारेकर, बालकलाकार दिवेश मेडगे अशी विनोदी कलावंतांची तगडी स्टारकास्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर