महेश कोठारे यांचा झपाटलेला-२
महेश कोठारे यांचा झपाटलेला-२ सध्या बराच चर्चेत आहे. तब्बल २० वर्षानंतर तात्या विंचूच्या रुपाने हा बाहुला आपल्या भेटीला येतोय. या बाहुल्यानेही नव्याने पडद्यावर येताना आता तंत्रज्ञानाचा आधार घेतलाय. या सिनेमात असलेले स्टंट सीन, थ्रीडी टेक्नॉलॉजी लक्षात घेऊन बाहुल्यात रेडिओ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. याबद्दल बोलताना अपर्णा पाध्ये म्हणाल्या कि या तंत्रज्ञानाला अनिमेट्रॉनिक्स असंही म्हणतात. यामध्ये बाहुल्यात सेन्सर्स लावले जातात. मग पन्नास फुटांवरून आपण तो बाहुला रिमोटने ऑपरेट करू शकतो. अमेरिकेत सर्रास हे तंत्रज्ञान वापरलं जातं. पण , रामदास पाध्येंना इथे हा प्रयोग करायचा होताच. ते यात शक्य झालं. खर्चिक असूनही कोठारे यांनी हे तंत्रज्ञान वापरलं. आपल्याकडे पहिल्यांदाच हे तंत्रज्ञान वापरलं जातंय. यामुळे अनेक स्टंट सीन करणं सोपं झालं. तरी आम्हाला हातानेही बाहुला हलवावा लागलाच. मी , रामदास आणि सत्यजीत तिघांनी मिळून ही जबाबदारी पार पाडली.
Comments