' दुनियादारी ' सिनेमाच्या गीतांची ध्वनीफीत प्रकाशित

मुंबई। मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय बनलेली ' दुनियादारी ' सिनेमाच्या गीतांची ध्वनीफीत नुकतीच प्रकाशित करण्यात आलीय अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं . यावेळेस ' दुनियादारी ' चे लेखक सुहास शिरवळकर , त्यांच्या पत्नी सुगंधा आणि मुलगा सम्राट यांच्या
हस्ते सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. मराठी सिने इंडस्ट्रीतील अकरा नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन गायलेलं ' जिंदगी जिंदगी ...' हे गाणं आणि सोनू निगम व सायली पंकज यांचं ' टिक टिक वाजते डोक्यात ' ही या सिनेमातली गाणी यापूर्वीच लोकप्रिय झाली आहेत . सिनेमाची गाणी सचिन पाठक , मंगेश कंगणे , मंदार चोलकर यांनी लिहिली आहेत , तर से बँडचे सचिन पाठक , अभिषेक , समीर यांच्यासोबत अमितराज आणि पंकज पडघन यांचं संगीत आहे . या ध्वनीफितीचं वेगळेपण म्हणजे यात गीतांसोबत त्याच्या करावके ट्रॅक्सचा समावेश आहे . व्हिडीओ पॅलेसनं प्रकाशित केलेल्या या ध्वनीफितीत इतर गाजलेल्या गाण्यांचा समावेश असल्यामुळे एकूण 31 गाण्यांचा आस्वाद रसिकांना घेता येईल .



Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर