राजस्थान मधील भरतपूर मध्ये भरत जाधव
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा सुपरहिट अभिनेता भरत
जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला आता माझी हटली... या चित्रपटाचे पहिल्या सत्राचे चित्रिकरण
नुकतेच राजस्थानमधील भरतपूर येथे संपन्न झाले.
चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुरु झालेले हे
चित्रिकरण रामनवमीपर्यंत सुरु होते. आता माझी हटली... या चित्रपटात भरत जाधव व नवतारका
रुचिता जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजस्थानात ४२ डिग्री इतके तापमान असतानाही
भरतने आडेवेडे न घेता चित्रिकरण पूर्ण केले.
शालिन आर्ट्स प्रॉडक्शनची निर्मिता असलेल्या आता माझी
हटली... चे निर्माते शालिन सिंग व आदित्य नारायण सिंग तर महेंद्र देवळेकर चित्रपटाचे
डायरेक्टर आहेत.
ह्या चित्रपटात भरत जाधव एका रिक्षा ड्राइव्हरची भूमिका
करीत असून तो करोडपती श्रीमंत मुलगी नेहाच्या प्रेमात पडला आहे. या प्रेमासाठी भरत
जाधवला काय काय करावे लागते हे या चित्रपटात विनोदी व मनोरंजकतेने दाखविण्याचा प्रयत्न
केला गेला आहे.
Comments