तुझं माझं जमेना झी मराठी वर 13 मे रोजी झळकणार
हिंदी आणि मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीत आपली जबरदस्त मोहोर उमटवणारे अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आता टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. महेश मांजरेकर यांची पहिलीच निर्मिती असलेली मराठी मालिका तुझं माझं जमेना 13 मे रोजी झी मराठी वाहिनीवर दाखल होत आहे. तुझं माझं जमेना ही मालिका शीर्षकावरुनत सासू सुनेच्या नात्यातली गंमत सांगणारी मालिका आहे, हे आपल्या लक्षात आलंच असेल. मात्र तरीदेखील ही मालिका इतर मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी असेल, असा दावा महेश मांजरेकर यांनी केला आहे. या मालिकेविषयी महेश मांजरेकर यांनी सांगितले की ही आजच्या काळातल्या सासू सुनेची गोष्ट आहे. या सासू सुनांच्या एकमेकीबाबत कुरबुरी नक्की असतील, मात्र त्या परस्परांच्या विरोधात कट कारस्थानं करणा-या नाहीत. खरं पाहता या सासू सुनांपेक्षा दोघांच्या मध्ये अडकलेल्या पुरुषाची ही कथा आहे. ज्याला आईचं म्हणणं पुरेपूर पटंत आणि बायकोलाही दुखवायचं नसतं. सासूसुनेच्या वादविवादात फसलेल्या मुलाची ही गोष्ट आहे. तरीदेखील ती सासू सुनेचं विश्व अधोरेखित करते. दोघींच्या नात्यांचे अर्थ उलगडून दाखवणारी आणि मानवी स्वभावाचे कंगोरे अधोरेखित करणारी ही मालिका आहे.
Comments