एकता कपूर ची नवी मालिका जोधा अकबर
एकता कपूर आता ऐतिहासिक मालिकांच्या निर्मितीकडे वळली आहे. बालाजी टेलिफिल्म्सचा परीसस्पर्श असलेली 'जोधा अकबर' ही ऐतिहासिक मालिका लवकरच झी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. एकताच्या 'जोधा अकबर'मध्ये या प्रेमकथेला फाटा देण्यात आला आहे. ही मालिका बादशाह अकबर याच्या राजकीय प्रवासावरभर देणारी आहे. जून महिन्यात ही मालिका झी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत बादशाह अकबराची भूमिका रजत टोकस तर परिधी शर्मा ही अभिनेत्री जोधाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अश्विनी काळसेकर महामांगाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Comments