शिवसेना चित्रपट सेनेमुळे ‘प्राइम फोकस’च्या कलाकारांना मिळाली हक्काची अनामत रक्कम

मुंबई - शिवसेना चित्रपट सेना ही चित्रपट सृष्टीतल्या प्रत्येकाला न्याय मिळवून देणारी आपली संघटना वाटते, याचा प्रत्यय नुकताच आला तो प्राइम फोकस कंपनीतील कलाकारांच्या अनामत रक्कमेच्या प्रकरणाच्या निमित्ताने.


प्राइम फोकस कंपनीतील कलाकारांच्या मदतीस चित्रपट सेना धावून गेली. या कंपनीत कामाला असलेल्या तसेच काम सोडून गेलेल्या कलाकारांची अनामत रक्कम चित्रपटसेनेच्या पाठपुराव्यामुळे परत मिळाली. त्यानंतर न्याय मिळालेल्या असंख्य कर्मचार्‍यांनी शिवसेनेचे आभार मानले.

गोरेगावातील रॉयल पाम येथे प्राइम फोकस आर्टिस्ट कंपनीत काम करणार्‍या असंख्य कामगारांकडून हमी म्हणून अनामत रकमा घेण्यात आल्या. परंतु काही कारणामुळे नोकरी सोडणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांनी भरलेली अनामत रक्कम देण्यास कंपनीकडून टाळाटाळ सुरू होती. मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याचे प्राइम फोकसच्या कर्मचार्‍यांनी आपली व्यथा शिवसेना चित्रपट सेनेकडे मांडली. शिवसेना सचिव आणि शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट सेनेचे महाराष्ट्र चिटणीस अजय व्हनोळे आणि युवा सेनेचे उपशाखा अधिकारी विरल पटेल यांनी या कर्मचार्‍यांचे हक्काचे पैसे परत मिळावेत यासाठी पाठपुरावा केला. टाळाटाळ केली तर शिवसेनास्टाइल आंदोलन करण्याचा इशारा देताच प्राइम फोकसच्या कलावंतांचे पैसे देण्याचे कंपनीने तत्काळ मंजूर केले. यानंतर या कर्मचार्‍यांनी शिवसेना भवन येथे आदेश बांदेकर यांची भेट घेऊन आभार मानले. शिवसेना चित्रपट सेनेमुळेच न्याय मिळाला अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर