नातेसंबंधातील अनोखे बंध रेखाटणारी मालिका 'प्राजक्ता'

आयुष्याच्या प्रवासात अनेक नाती नव्याने जोडली जातात, जुन्या नात्यांचे संदर्भ बदलतात. नात्यातील ह्या छटा रेखाटणारी, भावस्पर्शी कथानकावर आधारीत 'प्राजक्ता' ही मालिका 'मी मराठी' वाहिनीवर दाखल झाली आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे दिग्गज अशा अनुभवी कलाकारांसोबत नव्या पिढीतील कलाकारांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने आपली वेगळी छाप पाडण्यात कोणतीच कसुर सोडलेली नाही. घरोघरी मातीच्या चूली. संसार म्हटला की भांडयाला भांडं लागतच. ही गृहीतकं ठरलेली असतात. नात्यांतला गोडवा, रुसवा, समजुतदारपणा, थोडासा खट्याळपणा हा ही त्यासोबत येतोच. या सार्‍यांचा प्रत्यक्ष अनुभव द्यायला प्राजक्ता ही मालिका आपल्या सेवेला तत्पर आहे. 'प्राजक्ता'च्या पुढील भागात अशाच काही आपल्या सगळ्यांच्या घरात घडणार्‍या भांडणांचा, खट्याळ आजीचा सल्ला, आईची प्रेममयी ओरड या सगळ्यांत प्राजक्ताचा सहभाग हे सारंच खुप छान जमून आलयं.
प्राजक्ताच्या आयुष्यात नव्या पर्वाला सुरुवात होते. ती नर्सची परीक्षा पास होऊन अभिचं क्लिनिक जॉइन करते. त्यातंच जागेचे प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी बॅंकेतून घेतलेले पैसे परत न केल्याने नानांचा झालेला संताप. . . भाऊ वडिलोपार्जित जागेवर धंदा टाकण्यास नानाकडे परवानगी मागतो, पण कावेरी त्याला साफ नकार देते. प्राजक्ता आणि अभिच्या एकत्र येण्याने आजीला असं वाटतं की अभि प्राजक्ताच्या प्रेमात पडलाय. अभि आणि प्राजक्तामधील प्रेम खुलेलं का? त्यांच्या कुटुंबातील तणाव सुटतील का? हे जाणून घ्यायची उत्सुकता आता फार काळ ताणायची गरज नाही. कारण आगामी भागामध्ये याचाच उलगडा होणार आहे तेव्हा नक्की पहा. . . 'प्राजक्ता' सोम. ते. शुक्र. सायं. ७.३० वा. 'मी मराठी' वाहिनीवर.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर