शंकर महादेवनच्या स्वरात 'महागुरु' चित्रपटाचे गीत ध्वनीमुद्रण
प्रभावी कथानक, पटकथेची वेगवान, नाविन्यपूर्ण हाताळणी, गोळीबंद संवाद आणि तांत्रिक कौशल्य या आणि अशा अनेक वैशिष्टयांमुळे आजकाल मराठी चित्रपटांना योग्य दिशा मिळाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. प्रेक्षकांच्या आवडी- निवडी हल्ली बदलत चालल्या आहेत. वेगवेगळ्या विषयांतून मांडल्या जाणार्या प्रश्नांमुळे प्रेक्षक विचार करायला प्रवृत्त होत आहेत. असाच एक सोशिओ- पॉलिटीकल अंगानं जाणारा संजय भुतडा निर्मित व सचिन शिंदे दिग्दर्शित 'महागुरु' या चित्रपटाच्या चित्रीकरणास नुकताच नाशिकमध्ये प्रारंभ झाला आहे. मुंबईच्या 'पर्पल' स्टुडिओत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या दमदार आवाजात 'महाराष्ट्र गीत' ध्वनीमुद्रित करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र शिवरायांचा मर्द मावळ्यांचा, महाराष्ट्र तुमचा माझा महाराष्ट्र सार्यांचा . . . महाराष्ट्र माझा' असे बोल असलेलं ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर लिखीत हे गीत संजय गीते यांनी संगीतबद्ध केलं आहे. — गणेश गारगोटे
Comments