चित्रपट जन्म

काजल किरण कनकधारा फिल्मस च्या बैनरखाली निर्मित मराठी चित्रपट जन्म प्रदर्शनास सज्ज आहे.
वैद्यकिय विषयाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट आई आणि मुलीच्या प्रेमाची आणि एकमेंकीसाठी काहीही करुन जाण्याची कथा सांगतो. निसर्ग आपल्या पद्धतीने चालत असतो. नियतीचा मनुष्य जीवनावर पूर्ण ताबा असतो पण या दोघांवर मात करायचा प्रयत्न केला तर नियती तुमच्यासमोर नवीनच आव्हान उभे करते. विज्ञान विश्वास आणि नियती या तिन्ही विषयांची योग्य सांगड ह्या चित्रपटात पहावयास मिळते.
ह्या चित्रपटातील मुख्य कलाकार रीमा, विणा जामकर, आनंद अभ्यंकर, स्मिता तलवलकर, अशोक शिंदे वल दिपक करंजीकर आहे.
गोवा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सात रेड कार्पेटवर चालून आल्यावर जन्म ला सांस्कृतिक कलादर्पणची ७ मानांकने, मटा सन्मानची ३ मानांकने, झी गौरव चे १ मानांकन प्राप्त झाले आहे.
निर्माती काजल किरण च्या मते हा संदेशात्मक चित्रपट आहे व दर्शकांनी नक्की आवडेल.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर