चित्रपट माझा काय गुन्हा? चा मुहुर्त संपन्न

मुंबई मध्ये खार सब-वे येथील जिमखाना मध्ये गुड़ी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर बॉलीवुड मधील स्टार अली खान, अनिल नागराज व शीपाद कुलकर्णी यांच्या हस्ते चित्रपट माझा काय गुन्हा? चा मुहुर्त क्लैप संपन्न झाला.
चित्रपट माझा काय गुन्हा? ची कथा सायबर क्राइम वर आधारित असून ह्या मध्ये थ्रिलर-सस्पेन्सचा धक्कादायक नजराना देखील आहे.
ह्या चित्रपटाची शुटिंग मुंबई, गोवा येथे सलग दो शेड्यूल मध्ये २५ दिवसात करण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा भरत पाटील यांनी लिहिली आहे व दिग्दर्शक राजेश सोनी आहेत. त्याच बरोबर चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत व म्यूजिक डायरेक्टर शिवराम परमार आहेत.
Comments