सिद्धार्थ जाधव चा नवा चित्रपट हुप्पा हुय्या
'अक्षरा फिल्म डिव्हीजन' ची निर्मिती असलेल्या 'हुप्पा हुय्या!' चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल सुर्वे यांनी केले असून हा धमाल चित्रपट येत्या २५ मार्चला राज्यात सर्वत्र एकाचवेळी प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटाचे आकर्षण म्हणजे आजवर मराठी चित्रपटांत अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन आपल्याला घडले आहे. 'हुप्पा हुय्या. . .!' या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच समर्थ रामदास स्वामींनी स्थापिलेल्या ११ ठिकाणांच्या हनुमानांचे मोठया पडद्यावर दर्शन होणार आहे. चित्रपटात सिद्धार्थ जाधवने हनम्या नावाच्या गावातल्या धांदरट तरुणाची भूमिका साकारली आहे. गावच्या सरपंचांचा मुलगा असलेला हनम्या हनुमानाचा भक्त असून टवाळकी करता-करता त्याच्या हातून नकळत चांगली कामे ही घडत असतात. वेगवेगळ्या प्रसंगातून हनम्या कशा प्रकारे धमाल घडवून आणतो याचे मजेशीर चित्रण 'हुप्पा हुय्या. . .!' चित्रपटात करण्यात आले आहे. ग्रामीण विनोदाचा बाज असलेल्या या चित्रपटात कथानकातील उपजत विनोदाला पटकथेच्या अनुषंगाने येणार्या भन्नाट व्यक्तिरेखांची साथ मिळाली आहे.
समित कक्कड आणि 'ड्रिम व्ह्यु प्रॉडक्शन प्रा. लि.' यांची प्रस्तुती असलेल्या या ग्रामीण पार्श्वभूमीवरील विनोदीपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केले आहे. 'हुप्पा हुय्या. . .!' चित्रपटात सिद्धार्थ जाधव सोबत मोहन जोशी, गणेश यादव, गिरीजा ओक, मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, कुशाल बद्रिके, वैभव मंगले, मानसी मागीकर, निलेश दिवेकर आदी कलाकारांच्या भूमिका पहायला मिळणार आहेत. विनोदाची खमंग फोडणी असलेल्या या चित्रपटात 'ऍक्शन' ची कमाल ही अनुभविता येणार आहे.
प्रकाश चव्हाण यांनी लिहिलेल्या गीतांना अजित परब यांनी संगीत दिले आहे. स्वप्नील बांदोडकर, डॉ. नेहा राजपाल, वैशाली सामंत सारख्या सुरेल गायकांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. 'हुप्पा हुय्या. . .!' चित्रपटात 'हुप्पा हुय्या. . . जय बजरंगा. . . ', 'वाकड टिकड वाकड टिकड. . . ', 'हल्ला हल्ला. . . ', 'हुप्पा हुय्या. . . जय बजरंगा. . . ' (हिंदी) ही चार मस्तीभरी सुरेल गीते आहेत. नॉन स्टॉप सुपरहिट गाणी असणारी ही ऑडिओ सीडी 'एव्हरेस्ट एण्टरटेण्मेन्ट' ने अवघ्या रु. ४५/- उपलब्ध केली असून प्रेक्षकांच्या ती पसंतीस उतरली आहेत. चित्रपटाचे छायांकन राष्ट्रीय पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध कॅमेरामन ए.के. बीर यांनी केले असून कलादिग्दर्शन अमर गायकवाड, वासु पाटील यांचे आहे. 'आयफा अवॉर्ड' विजेते जावेद इजाज यांनी या चित्रपटाची साहस दृश्ये दिग्दर्शित केली आहेत. चित्रपटाचे वितरण अनिल थडानी करीत आहेत. यातील 'हुप्पा हुय्या. . . जय बजरंगा. . . ' या गीताच्या चित्रीकरणात सिद्धार्थ सोबत शेकडो नृत्यकलाकारांनी एकत्रित नृत्य केले आहे. तर 'हल्ला हल्ला. . . ' अशी शब्दरचना असलेलं, वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत हिंदी अभिनेत्री कश्मिरा शहा यांच्यावर उमेश जाधव यांच्या नृत्य दिग्दर्शनाखाली भोरच्या राजवाड्यात चित्रीत करण्यात आलं आहे. आकर्षक जाहिराती, पोस्टर, फेसबुक, ध्वनीफित, मोबाईल कॉलर टयून्स सारख्या अनेक माध्यमांतून या चित्रपटाची जोरदार पब्लिसिटी करण्यात आली आहे.
प्रभावी कथानक, नेत्रदिपक लोकेशन, कर्णमधुर संगीत आणि त्याला उत्तम कलाकारांची साथ ही 'हुप्पा हुय्या. . !' ची बलस्थान आहेत. त्याला अनुभवी तंत्रज्ञ आणि आधुनिक माध्यमांची जोड मिळाली आहे. यातून 'हुप्पा हुय्या. . !' प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यास हातभार लागणार आहे.

Comments