'धरपकड' चित्रपटाचे गीत ध्वनीमुद्रण
'शुभम सिनेव्हिजन' निर्मित, आत्माराम धर्णे दिग्दर्शित 'धरपकड' चित्रपटातील गीतांचे ध्वनीमुद्रण गायिका बेला शेंडे, वैशाली भैसने माडे यांच्या आवाजात अंधेरीच्या 'स्वरलता' स्टुडिओत करण्यात आले. 'ज्वानीच्या मैदानी राया इष्काची खेळू कबड्डी. . ' हे प्रेमगीत वैशाली भैसने-माडे यांनी गायले असून 'रागिणी तू रणरागिणी. . . ' हे स्त्री शक्तीचं वर्णन अधोरेखित करणारे गीत बेला शेंडेंच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. सुबोध पवार यांनी लिहीलेल्या या गीतांना संगीतकार आशय यांनी संगीताची साथ दिली आहे.
जुल्मी व्यवस्थेविरुद्ध सात स्त्रियांनी दिलेल्या एकत्रित लढ्याची कथा 'धरपकड' चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटात या स्त्रियांच्या लढ्याचे नेतृत्व निर्मिती सावंत यांनी केले असून त्यांच्या सोबत सात भन्नाट स्त्री व्यक्तिरेखा आपल्याला पहायला मिळणार आहेत. 'धरपकड' चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद आत्माराम धर्णे यांनीच लिहिले आहेत.
सौ. नीता प्रसाद लाड निर्मित या चित्रपटात निर्मिती सावंत, नागेश भोसले यांच्या सोबत प्रिया बेर्डे, तेजा देवकर, मेघा घाडगे, स्वाती देवल, सिया पाटील, भारत गणेशपुरे, आनंद कारेकर, सागर करंडे आदीच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. श्याम चव्हाण चित्रपटाचे छायाचित्रण करणार आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सत्यवान गावडे सांभाळीत असून निर्मिती व्यवस्थापन पूनम घोरपडे यांच्याकडे आहे. विनोदाची झणझणीत फोडणी असलेल्या 'धरपकड' चित्रपटाच्या चित्रीकरणास १८ मार्चपासून कोल्हापूर परिसरात सुरुवात होणार आहे.

Comments