चित्रपट 'अर्जुन' चा मुहूर्त संपन्न

स्वप्नं सगळेच पाहतात पण सगळ्यांची स्वपनं प्रत्यक्षात उतरतातच असे नाही. आयुष्यात आपल्याला जे हवं ते सहजा- सहजी कधीच मिळत नाही. जे आवडतं ते करायला मिळतेच असं नाही पण त्याही परिस्थितीत आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मनाविरुद्ध वागावे लागते. आपल्या छंदांना तिलांजली द्यावी लागते. हातावर मोजण्याइतकीच लोकं आपल्या ध्येयाने पछाडतात आणि त्यासाठी काहीही करायला तयार असतात. हे तेव्हाच शक्य असते जेव्हा एकतर त्याला कुटुंबाचा खंबीर पाठींबा असतो नाहीतर हाती असलेल्या कामातून सुटका होईपर्यंत तो इतर गोष्टींचा विचारचं करत नाही अथवा त्याला करता येत नाही.
हल्ली आर्थिक मंदीमुळे बेरोजगारीची कुर्‍हाड सगळ्यांवरच कोसळलेली दिसते या परिस्थितीत तरुणच काय तर सगळ्यांपुढे आत्महत्येचा एकच पर्याय उरलाय असं वाटतं. पण त्याचवेळी ही आपल्याला मिळालेली, काहीतरी करुन दाखवण्याची संधी आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही. असाच एक प्रेरणादायी विषय घेऊन विनर्स एण्टरटेनमेन्ट प्रस्तुत, शशिकांत खामकर निर्मित आणि शैलेश शंकर काळे दिग्दर्शित अर्जून हा चित्रपट आकारास येणार असून नुकताच या मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला.
अर्जुन चित्रपटाची कथा एका जिद्दी तरुणाभोवती घडते. प्रायवेट फर्ममधील दहा ते बारा तासांची नोकरी केल्यावर हातात येणारा पगार व त्यातून वाढत जाणारी महागाई या दोन्हींच्या सापळ्यात चित्रपटाचा नायक अडकून गेला आहे. दहा बाय बाराच्या खोलीत रात्री डोळे मिटल्यावर श्रीमंत झाल्याची स्वप्ने सकाळी बायको तोंडावर पाणी मारुन पुसून टाकते. व्यवसाय करायची तीव्र इच्छा पण वडिलांच्या धाकातून तीही करता येत नाही. अशातच पुढे प्रायवेट फर्ममधली नोकरी गेल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. पण त्याहीपरिस्थितीत योग्य मार्गदर्शनामुळे अर्जुन नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून यशाच्या व श्रीमंतीच्या पायर्‍या चढत जातो. पण हा सारा प्रवास सोपा नसतो तर प्रत्येक पायरीला त्याला संकटाशी दोन हात करावेच लागतात.
चित्रपटाचे दिग्दर्शन श्री. शैलेश शंकर काळे यांनी केले आहे तर चित्रपटाची कथा- पटकथा व संवादाची बाजू श्री सुमित बोनकर व श्री. राहुल यशोद यांनी सांभाळली आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA