मी मराठी पर प्राजक्ता
'लग्न' हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय. आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा याची प्रत्येकाच्या मनात पुसटशी कल्पना असते. अशाच प्रकारचं काहीसं कथानक तुम्ही यावेळच्या 'प्राजक्ता' या मालिकेत पाहणार आहात. प्राजक्ताच्या मनात अभिच्या प्रेमाचा अंकुर खोलवर रुजू पाहतोय. अभिने तिच्याशीच लग्न करावं अशी तिची इच्छा आहे. ती देवाकडे आपली मनोकामना पूर्ण करण्याची मागणी करते. तर दुसरीकडे कावेरी अभिचं लग्नं एका मोठया उद्योगपतीच्या मुलीशी लावण्याचं ठरवते, त्यांच्याकडून मिळणार्या हुंड्याच्या मोठ्या रकमेमुळे अभिच्या मनाचा विचारच करत नाही. पण अभिला हे मान्य नाही तो आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय स्वतः घेण्याच ठरवतो. या गोष्टीमुळे कावेरी खुप दुखावली जाते. त्यातच बँकेतून घेतलेले पैसे परत करण्यासाठी नाना जमिनीचा एक तुकडा विकतात. न सांगता घेतलेल्या या निर्णयामुळे कावेरी अजूनच चिडते. अभिच्या आणि प्राजक्ताच्या आयुष्य एका वेग्ळ्याच वळणावर येऊन थांबलयं. या सार्यांची उकल पुड्।ईल भागात तुम्ही पाहू शकाल. तेव्हा नक्की पहा. 'प्राजक्ता' सोम. ते शुक्र. सायं ७.३० वा. 'मी मराठी' वाहिनीवर.
Comments