'क्रांतीवीर राजगुरु' चित्रपटाची ध्वनीफित प्रकाशित
ब्रिटीशांशी लढतांना वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्राणाची आहुती देत केलेला रक्तरंजित संघर्ष कायम स्मरला जावा यासाठी 'श्री. भवानी चित्र कम्बाईन्स' या चित्रपटनिर्मिती संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने 'क्रांतिवीर राजगुरु' या भव्य मराठी ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्माता अशोक कामले यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या 'क्रांतिवीर राजगुरु' या चित्रपटाच्या ध्वनीफितीचे प्रकाशन केंद्रीय अर्थामंत्री मा. प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत मुंबईत संपन्न झाले. याप्रसंगी 'फिल्म फेडरेशन ऑफ इंडीया' या सिने जगतातील अग्रगण्य संघटनेने आणि निर्माते- दिग्दर्शक अशोक कामले यांनी मा. अर्थमंत्र्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, निर्माता दिग्दर्शक यश चोप्रा, रॉनी स्क्रूवाला, बोनी कपूर, मुकेश भट्ट तसेच हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकाशन समारंभानंतर 'क्रांतीवीर राजगुरु' चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते. 'क्रांतीवीर राजगुरु' चित्रपटात चिन्मय मांडलेकर हे राजगुरुच्या प्रमूख भूमिकेत असून सोबत पंकज विष्णू, मिलिंद गुणाजी, सुहासिनी मुळ्ये, शरद पोंक्षे, आनंद अभ्यंकर, विलास चव्हाण या कलाकारांच्या भूमिका आहेत.
Comments