खुर्चीसम्राट चे निगेटीव्ह कटिंग संपन्न

येणा-या निवडणूकीच्या रणधुमाऴीत खुर्चीसम्राट या राजकारणातील उलाढाल दाखवणा-या चित्रपटाचं तांत्रीक बाबी पूर्ण झाल्या आहेत. नुकतंच या चित्रपटाचे निगेटीव कटींग क्यू लैब अंधेरी येथे चित्रपट सृष्टीतील जाहीरात डिझाईन बनविणारे प्रख्यात डिझाईनर श्रीकांत घोंगड़े यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी चित्रपटाचे निर्माते सुरेंद पन्हाऴकर, दिग्दर्शक दत्ताराम तावडे आदि उपस्थित होते.
वाघ्यामुरळी जमातीतील साधाभोळा तरुण नगरसेवक, आमदार झाल्यानंतर दिल्लीला जाण्याची स्वप्न पहातो त्यासाठी कशी काय उलाढाल करतो अशा राजकरणावर सडेतोड भाष्य करणा-या या चित्रपटाचं लेखन एन रेऴेकर याचं असून पटकथा-संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. संगीतकार अशोक पत्की यांनी प्रविण दवने, श्रीकांत नरुले व बापू घराल यांच्या गीतरचना शब्दबद्ध केल्या आहे. कैमरामेन आहेत अझिझभाई मोतीवाला,संकलन विजय खोचिकर, कला दिग्दर्शक मधू पाटील, नृत्ये नरेंद्र पंडित, प्रकाश हिलगे, विशाल पाटील यांची आहेत.
चित्रपटातील मुख्य कलाकार आहेत मकरंद अनासपूरे, ऋतुजा पाटील, बाऴ धूरी, चेतन दलवी, किशोरी अंबीये, विलास रकटे, अनुजा रानडे, शांता तांबे, एन रेऴेकर, आकाराम पाटील, मिलिंद ओक. त्याच बरोबर सुरेखा कुड़ची हिच एक दिलखेचक नृत्य सादर केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर