स्मिता... मूर्तिमंत अस्मिता

स्मिताच्या आठवणीसाठी एक रात्र नव्हे संपूर्ण आयुष्य अपूरे पडेल. हे जग असेपर्यंत तिची आठवण काढली जाईल... चाळीस वर्षे चित्रपटसृष्टीत काढूनही मी स्वताच्या मातृभाषेत काम करु शकले नाही. पण अवघ्या आठ-दहा वर्षाच्या कारकिर्दीत स्मिताने आठ भाषांमध्ये कामे केली. आपल्या कलेने सर्व प्रांतांची लाडकी बनलेली स्मिता ही ख-या अर्थाने काऴाच्या पुढची अभिनेत्री होती. स्मिता पाटीलच्या अशा अनेक आठवणींना उजाऴा देत सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रेखा भूतकाऴात रमून गेली. निमित्त होते मूर्तिमंत अस्मिता या कार्यक्रमाचे. यावेळी ललिता ताम्हाने लिखित स्मिता, स्मितं आणि मी या पुस्तकांचे प्रकाशन रेखाने केले. याप्रसंगी स्मिताचे वडील शिवाजीराव पाटील, आई विद्याताई पाटील, मुलगा प्रतिक, लेखिका ललिता ताम्हाणे, शरद काऴे व प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष उपस्थित होते.
सुधीर मोघेंच्या लेखणीतून उतरलेलं मनांमनातून मनस्विनी ही तळपे विद्युल्लता... ही मूर्तिमंत अस्मिता... हे कार्यक्रमासाठी बनविलेलं खास गीत गान सम्राज्ञी आशा भोसले यांनी गायलं आहे. स्मिता पाटील यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन आणि त्यांच्या गाजलेल्या गीतांची श्रवणीय मेजवाणी असलेला मूर्तिमंत अस्मिता हा संगीतमय कार्यक्रम उपस्थित सर्व स्मिताप्रेमींच्या पसंदीत उतरला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर