हॉटेल हनिमून नाटकाचा शुभारंभ

संजीवनी थिएटर्स आणि श्री कऴेश्वर प्रोडक्शनच्या बैनरखाली निर्माते स्वप्निल आणि संजीवनी जाधव निर्मित हॉटेल हनिमून हया धमाल विनोदी फर्सिकल नाटकाचा शुभारंभ झाला आहे. यात प्रदीप पटवर्धन, मयुर कोटेकर, पूनम जाधव, अंकिता चंद्रकांत, रोहन पेडणेकर, प्रदीप डोईफोडे, विनय खानविलकर आणि संजीवनी जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संजीवनी जाधव ह्यांची ही दूसरी नाट्य निर्मिती असून ह्या आधी त्यांनी पोलीस बि घडवतात या यशस्वी विनोदी नाटकाची निर्मिती केली आहे.
हनिमून हॉटेलात हनीमूनसाठी उतरलेल्या एका जोडप्याची आणि त्यांनी आपल्या इच्छे विरुद्ध लग्न केल्याच्या रागाने त्याच्या हनिमून न होता त्याना वेगऴ करण्याच्या मुलिच्या आईवडिलांच कारस्थान असतं. पण हॉटेल मालकाचा ह्या विवाहाला विरोध असतो. अशा पार्श्वभूमिवर त्या हॉटेलात हास्याचा फुलोरा फुलवणा-या अनेक विनोदी वेगवान घटना घडतात व प्रेक्षक पोट धरून हसतात. केवऴ विनोदच नाही तर जोड़ी नृत्य व संगीताची भरभाट असलेलं हे नाटक प्रेक्षकांना मनपसंद करमणुक देऊन त्यांना मनमुराद हसवित व रसिकांना एक निर्मळ करमणुकांचा आनंद मिऴेल ह्या हेतुने ह्या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर