कलाकारांना लागलंय वैनिटी वैनचे याड
शंकर मराठे, मुंबई - ३० सप्टेबर २०२२ : जुन्या काळी सिनेमाचे चित्रीकरण सुरू असताना ज्या कलाकारांचा सीन नसायचा ते कलावंत देखील आपल्या सहकलाकाराची शूटिंग पाहण्यासाठी सेट वर खास करून उपस्थित असायचे, परंतु आताच्या काळात कलाकार आपला सीन संपला की लगेच वैनिटी वैन मध्ये जाऊन आरामात बसतात. त्यामुळे सध्याच्या कलाकारांना सेट वर काय चाललंय ते कळतंच नाही. सध्या अशी स्थिती बौलीवुड फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांची झाली आहे. फिल्म इंडस्ट्री मधील जानकार सांगतात की आजच्या आधुनिक युगातील कलाकारांना लागलंय वैनिटी वैनचे याड. त्यामुळे आताचे कलाकार डायरेक्टरच्या बोटावर नाचणारे कठपुतली बनले आहेत. कलाकार स्वत: कडून काही ही वेगळे करण्याचा प्रयत्न करीत नाही. एवढेच काय तर डायलॉग देखील डायरेक्टर सांगेल तसंच बोलतात. संवाद बोलण्याची अदा जणू काही संपलीय असे चित्र निर्माण झाले आहे.