अभियान सन्मान मध्ये अभिनेते अविनाश नारकर उपस्थित राहणार
शंकर मराठे - मुंबई, 30 मे 2022 - अभियान सन्मानचे ४६ वे पुष्प आहे. अभिनेते अविनाश नारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मे महिन्यात दिवंगत झालेल्या कर्तृत्व सिद्ध केलेल्या चार व्यक्तींचे 'दखलपत्र' देऊन स्मरण केले जाणार.
या दिवंगताच्या नावाचे पुरस्कार समाजात लौकिक कार्य करणाऱ्या गुणी जनांना दिला जाणार आहे.
दिवंगत पद्मश्री जिव्या सोमा म्हसे हे वारली चित्रशैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्याच चित्रशैलीच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यासाठी त्यांची प्रेरणास्रोत अर्पणा ढाक ही जे. जे. स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थिनी आहे. ती 'जैत रे जैत' या चित्रपटातल्या गीतांवर आपले चित्र पूर्ण करणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क पत्रकार - नंदकुमार परशुराम पाटील, अध्यक्ष - कलाश्रम ९८६९००८८०५
Comments