लंडन मिसळ चे शूटिंग लंडन मध्ये होणार
शंकर मराठे - मुंबई, 6 मे 2022 - अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मराठी सिनेमा 'लंडन मिसळ' या चित्रपटाची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे.
श्री.रवींद्रनाथ टागोर यांनी लिहीलेल्या एका नाटकावरून प्रेरित होऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर झळकले असून या पोस्टरमध्ये एका मुलीने पुतळ्यामागे लपून त्या पुतळ्याला आपल्या हाताने मिशी लावलेली दिसत आहे. हा नक्की कोणाचा चेहरा आहे आणि याचा नेमका अर्थ काय, हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. लवकरच या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु होणार असून वर्षअखेरीस 'लंडन मिसळ' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Comments