दाट लोकवस्ती आणि अरुंद गल्ली मध्ये खूपच प्रभावी आहे फायर बॉल
परिवहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास ने आज राजधानी जयपुर मध्ये फायर बॉल चे लोकार्पण केले. आग लागल्यावर अग्निशामक वाहन येण्यासाठी विलंब होतो. त्याचबरोबर जेथे लहान व अरूंद गल्ली असतात. तेथे अग्निशामक वाहन पोहचण्यासाठी अजून जास्त वेळ लागतो, त्यामुळे आग भयंकर रूप धारण करते आणि जीवित व मालमत्ते चे नुकसान अधिक होते. फायर बॉल हा आगीमुळे होणारी जीवित व मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी एक नविन अभिनव मार्ग आहे. बॉल सारखा दिसणारा हा बॉल फुटल्यावर त्यातून बाहेर पडणा-या रसायनांमुळे आग विझविण्यास मदत होते. अशा प्रकारच्या फायर बॉलचा वापर आपण कार, घर, शॉपिंग मॉल, शाळेसह कोठेही आग लागल्यास करू शकतो. क्रिकेट बॉलच्या आकारापेक्षा दुप्पट आकाराचा असणारा हा बॉल फक्त १.३ किलो वजनाचा आहे, तर फायर एक्सटिंग्विशर च्या बाटलीचे वजन सुमारे ६ ते ७ किलो असते. फायर एक्सटिंग्विशरचा वापर करण्यास थोडा कठिण आहेत, तर लहान आकार आणि कमी वजनामुळे एखादी व्यक्ती आवश्यकतेनुसार सहजपणे फायर बॉल वापरु शकते. परिवहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास म्हणाले की हा फायर बॉल अत्यंत उपयुक्त ठरेल. आग लहान असो की मोठी, हया फायर बॉल द्वारे ती विझविली जाऊ शकते. चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राकेश साबरवाल म्हणतात की, "काही दिवसापूर्वी गुजरातमधील कोचिंग इन्स्टिट्यूट आणि राजस्थान मधील एक रेल्वेच्या डब्यात आग लागल्याची घटनेमुळे त्यांना प्रेरित केले कि राजस्थान मध्ये अचानक लागली तर कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान न होण्यासाठी काहीतरी नवीन केले पाहिजे. आपल्या घरात- कार्यालयात अग्निशामक असूनही देखील बहुतेक लोकांना या साधनांचा उपयोग आग विझवण्याकरिता करू शकत नाहीत किंवा आवश्यकतेनुसार त्यांना चालवण्याचे प्रशिक्षण नसल्यामुळे किंवा ती वापरण्यास प्रशिक्षित होत नाहीत. अशा परिस्थितीत आगी पासून नुकसान होते. म्हणूनच मी फायर बाल राजस्थान मध्ये लांच करण्याचा निर्णय घेतला. ”ब्रांड्सडैडी चे चेयरमैन रोशन मिश्रा म्हणाले कि ह्या फायर बाल चे निर्माण राजस्थान मध्येच केले जात आहे. ह्या वेळी प्रख्यात ज्योतिषी डॉ पवन कौशिक, माहेश्वरी समाज चे अध्यक्ष प्रदीप बाहेती, एन एस आदित्य ग्रुप चे जे डी माहेश्वरी सोबत काही मान्यवर उपस्थित होते.
Comments