कुमार सानू यांनी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘खली बली’ साठी रोमांटिक गीत गायले.
बॉलीवुड मधील सुप्रसिद्ध गायक कुमार सानू सध्या फारच व्यस्त आहेत. त्यांनी येणारा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘खली बली’ साठी रोमांटिक गीत गायले, ज्याचे संगीत तयार केले आहे पूनम ठक्कर व सुरेश रहेजा ने, तर गाण्यांचे लेखन केले आहे शब्बीर अहमद ने. गाण्याची रिकॉर्डिंग अंधेरी येथील ऐ एम वि स्टूडियो मध्ये संपन्न झाली, तेथे एक्ट्रेस मधु, हेमंत पांडे व रोहन मेहरा आले, जे ह्या सिनेमात काम करत आहेत सिनेमाचे निर्माता आहेत. कमल किशोर मिश्रा व लेखक-दिग्दर्शक आहेत मनोज शर्मा. हा सिनेमा वन एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शंस व प्राची मूवीज बैनर खाली बनविला जात आहे. सिनेमा ६५ टक्के शूट झाला आहे आणि पुढील शूट लखनऊ मध्ये होणार आहे. चित्रपटातील कलाकार आहेत धर्मेंद्र, मधु, रजनीश दुग्गल, कायनात अरोरा, रोहन मेहरा, विजय राज, राजपाल यादव, हेमंत पांडे, यासमीन ख़ान, असरानी व एकता जैन। हा सिनेमा एप्रिल २०२० मध्ये रिलीज़ होणार आहे.
Comments