सौरभ गोखले म्हणतोय ‘येताय ना लग्नाला’
निर्माता अमोल उतेकर व दिग्दर्शक प्रदीप मैस्त्री एका नव्या-को-या मनोरंजक मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहे आणि त्या चित्रपटांचे नाव आहे ‘येताय ना लग्नाला’. ह्या चित्रपटांच्या सेट वर अभिनेता सौरभ गोखले बरोबर चर्चा केली. तेव्हा सौरभ म्हणाला कि मी आतापर्यंत जे काही रोल केले आहेत त्यापेक्षा ह्या चित्रपटांतील माझा रोल जरासा हटके आहे, परंतु फारच धमाकेदार व मजेदार रोल आहे. चित्रपट ‘येताय ना लग्नाला’ मध्ये समीर नावाच्या मुलाचे कैरेक्टर साकार केले आहे व त्याचे लग्नाचे वय झालेले असते व तो चाळीत राहणारा, भोळा-भाबडा व जुने विचार जपणारा असतो. त्यांचे लग्न ठरविताना काय-काय धम्माल मस्ती येते व त्याच्याबरोबर कोण-कोण मुली येतात. ह्या सर्वांच्या धम्माल-मस्तीचा खजाना दर्शकांना ह्या सिनेमात पहावयास मिळेल.
Comments