दिग्दर्शक गजेंद्र अहिरे घेऊन येत आहे `आजच्या माइक्रो फैमिली युगातील ‘सोहळा’
प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा यांच्या अरिंहत फिल्म प्रोडक्शनच्या बैनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘सोहळा’ च्या अंतिम शेड्यूलचे चित्रिकरण नुकतेच मड आयलैंड स्थित क्रिश विला येथे पार पडले.
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी चित्रपटांविषयी माहिती देताना सांगितले कि चित्रपटांचे कथानक हे आजच्या माइक्रो फैमिली युगातील आहे. ह्यामध्ये नातेसंबंधातील झालेला बदल व एक वेगळेपण दाखविण्याचा आगळावेगळा प्रयत्न केला आहे.
सचिन व शिल्पा ने मुख्य भूमिका साकारली आहे तर ह्या चित्रपटांत विक्रम गोखले, लोकेश गुप्ते, मोहन जोशी व इतर कलाकारांच्या भूमिका देखील तेवढ्याच महत्वपूर्ण आहे. हा चित्रपट एप्रिल-मे महिन्यात प्रदर्शित करण्याचा मानस आहे.
Comments