राहुल शर्मा ने आपला पहिला हिंदी चित्रपट 'एक्स रे - द इनर इमेज’ साठी 20 किलो वजन घटविले
कोण म्हणते
बॉलीवुड मधील केवळ महिलांना शारीरिक रूढीवादी
गोष्टींचा सामना करावा लागतो? अशी माणसे आहेत ज्यांनी अशा पूर्वग्रहांकडे
बळी पडून संधी गमावल्या! आगामी स्टार राहुल शर्मा ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीला
चालना देण्यासाठी अनेक अडथळ्यांना पार केले आणि २० किलो वजन कमी करून एक महान परिवर्तन घडवण्याचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे!
बिहारच्या मुजरपूर येथील राहुल ने आपल्या रंगरुपाविषयी फारच भोगले आहे. विदूर चतुर्वेदी यांच्या अभिनय अकादमीतून औपचारिक प्रशिक्षण घेतल्यानंतर, त्याच्या प्रारंभिक ऑडिशनमध्ये, राहुलला अभिनय आणि रंगरुपासाठी रिजेक्ट करण्यात आले होते. राहुल सांगतो की, "होय, ते सत्य आहे. मी जाडजुड आणि दिसण्यास चांगला नसल्यामुळे म्हणून नाकारले!" शेवटी माझी पहिला चित्रपट 'एक्स रे - द इनर इमेज’ साठी निवड झाली.
"मी ऑडिशन्ससाठी गेलो, जिथे लोक माझ्या प्रतिभापेक्षा माझ्या दिसण्याकडे जास्त उत्साह दाखवित होते, परंतु हा चित्रपट मी त्या सर्वांना उत्तर देतो," शर्मा म्हणतात. "मी हे मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहे.. मी माझी अभिनय कौशल्यता आणखीनच सुधारली, कॅमेरा प्रशिक्षणही घेतले आणि २० किलो वजन ही कमी केले! प्रवास कठीण होता, मी हे शरीर मिळवण्यासाठी पर्याप्त आहार आणि कसरत करीत होतो. मी आनंदित झालो आहे की माझ्यासाठी काम केले आहे, "असे राहुल म्हणतो. वरुण धवन आणि टायगर श्रॉफ सारख्या अभिनेत्यांकडून प्रचंड प्रेरणा मिळाली आहे. राहुल म्हणाला, "मला वाटते की ते महान शिस्तीचे प्रदर्शन करतात आणि म्हणूनच मी वरुण व टाइगर यांची दोन्ही गोष्टींबद्दल प्रशंसा करतो. ते मला स्वत: वर कठोर परिश्रम करायला प्रेरणा देतात आणि म्हणून मी त्यांच्यासारखा बनू इच्छितो."
म्युझिक व्हिडिओ ने सुरुवात करुन आणि अनेक फैशन शो केल्यानंतर, राहुल आपल्या पदार्पणाच्या प्रकल्पाबद्दल उत्सुक आहे. हा चित्रपट राजीव एस. रुईया यांनी दिग्दर्शित केलेला हा थ्रिलर आहे, "राहुलने अतिशय सावधपणे सांगितले व अधिक तपशील देण्यास नकार दिला तर. चित्रपट बाबा मोशन पिक्चर्स ने बनविला आहे.
तसे पाहिले तर, राहुल शर्मा २०१९ चा आशाजनक स्टार दिसयोत! अट्टा बॉय!
--
Comments